Friday, December 10, 2010

फेसबुक मेळावा


http://www.facebook.com/home.php?sk=group_183488978333137
सर्वानुमते आपण १६ जानेवारी ला दादर येथे fb मेळावा करण्याचे ठरवले आहे, त्यानुसार काही ठिकाणी चौकशी केली आहे, पण नक्की किती येणार यावर पुढील सर्व अवलंबून आहे, हे तर आपण जाणतोच. तरी जे नक्की येणार आहेत त्यांनी सोमवार दुपारपर्यंत इथे नावे द्यावीत.

५ वर्षापर्यंत ची मुले आई- बाबा बरोबर येवू शकतील. आपल्या सर्वांच्या सहकार्याशिवाय मेळावा होवू शकत नाही ,तरी आपण इथे नावे द्यावीत, जे आपले मित्र मैत्रिणी येणार असतील , व काही कारणाने दोन दिवसात जर ते fb कडे फिरकणार नसतील ,तर त्यांची नावे सुद्धा आपण नोंदवू शकता ....



मन हिरवे मन ओले, मन अंबर नदी काठी ! मन नितळ मन माती, मन मराठी, मन मराठी
http://www.marathimann.in/


http://www.scribd.com/MarathiMann

Thursday, December 17, 2009

free blog MARATHI CALENDER KALNIRNAY 2010 मराठी दिनदर्शिका २०१० प्रसिध्द कालनिर्णय

मित्रांनो आपल्याला मराठी कॅलेंडर म्हणजेच मराठी दिनदर्शिका हि नेहमीच आणि कुठेही उपयोगी पडते, तर आम्ही घेऊन आलो आहोत आपणास मराठी दिनदर्शिका २०१० प्रसिध्द कालनिर्णय ह्याची स्कॅन कॉपी
तुम्हास उपयोगी पडेल च तशीच ती आपल्या मित्राच्या सुद्धा उपयोगी यावी साठी हि लिंक तुम्ही आपला मित्रांना द्या जेणे करून तेही कालनिर्णय आत्मसात करू शकतात... तुमच्या आभारी आहे ह्या बोल्ग ला भेट दिल्या बद्दल, जय महाराष्ट्र
MARATHI CALENDER KALNIRNAY 2010 FOR MARATHI BROTHERS,


please copy paste this link in browser
http://www.2shared.com/file/10047590/220e6530/Calender_2010_hindi_marathi.html





http://jump.fm/BSYSP

Thursday, May 8, 2008

हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा

हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

करि हिंदुराष्ट्र हें तूतें, वंदना
करि अंतःकरणज तुज, अभि-नंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची, चंदना
गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी
जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी
ती शुद्ध हेतुची कर्मी, राहुं दे
ती बुद्धि भाबडया जीवां, लाहुं दे
ती शक्ति शोणितामाजीं, वाहुं दे
दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थे तुज ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

घन ओथंबून येती, बनांत राघू भिरती

घन ओथंबून येती, बनांत राघू भिरती
पंखा वरती सर ओघळती, झाडांतून झडझडती

घन ओथंबून झरती, नदीस सागर भरती
डोंगर लाटा वेढित वाटा, वेढित मजला नेती

घन ओथंबून आले, पिकांत केसर ओले
आडोशाला जरा बाजूला, साजन छैल छबिला घन होऊन बिलगला

गणराज रंगि नाचतो

गणराज रंगि नाचतो
पायी घागर्‍या किरती रुणझुण
नाद स्वर्गी पोचतो

किट पीतांबर कसून भर्जरी
बाल गजानन, नर्तनास करि
तुंदिल तनु तरि चपल साजिरी
लावण्ये साजतो

नारद तुंबरु करिती गायन
करी शारदा वीणा वादन
ब्रम्हा धरितो, तालहि रंगुन
मृदंग धिमी वाजतो

देवसभा घनदाट बैसली
नृत्य गायने मने हर्षली
गौरीसंगे स्वये सदाशिव
शिशुकौतुक पाहतो

गणराज रंगि नाचतो

गणराज रंगि नाचतो
पायी घागर्‍या किरती रुणझुण
नाद स्वर्गी पोचतो

किट पीतांबर कसून भर्जरी
बाल गजानन, नर्तनास करि
तुंदिल तनु तरि चपल साजिरी
लावण्ये साजतो

नारद तुंबरु करिती गायन
करी शारदा वीणा वादन
ब्रम्हा धरितो, तालहि रंगुन
मृदंग धिमी वाजतो

देवसभा घनदाट बैसली
नृत्य गायने मने हर्षली
गौरीसंगे स्वये सदाशिव
शिशुकौतुक पाहतो

गंगा जमुना डोळयात उभ्या का

गंगा जमुना डोळयात उभ्या का
जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा

कडकडूनी तू मिठी मारता बाळे
बालपण आले आले, घुमवित घुंगुर वाळे
आठवले सारे सारे, गहिवरले डोळे
कढ मायेचे तुला सांगती जा

दारात उभी राहिली, खिलारी जोडी
बघ दिर धाकले बसले खोळंबून गाडी
पूस गं डोळे या पदराने, सावर ही साडी
रुप दर्पणी मला ठेवूनी जा

मोठ्याची तू सून पाटलीण मानाची
हसले तुझे गं हिरवे बिलवर लगीन चुडे
बघू नकोस मागे मागे लाडके बघ पुढे
नकोस विसरु परी आईला जा

गगन सदन तेजोमय, तिमिर हरुन करुणाकर, दे प्रकाश, देई अभय

गगन सदन तेजोमय, तिमिर हरुन करुणाकर, दे प्रकाश, देई अभय

छाया तव, माया तव, हेच परम पुण्य धाम
वार्‍यातून, तार्‍यातून, वाचले तुझेच नाम
जग, जीवन, जनन, मरण, हे तुझेच रुप सदय

वासंतिक कुसुमातून तूच मधूर हासतोस
मेघांच्या धारांतून प्रेमरुप भासतोस
कधी येशील चपल चरण, वाहीले तुलाच हृदय

भवमोचन, हे लोचन, तुजसाठी दोन दिवे
कंठातील स्वर मंजुळ, भावमधुर गीत नवे
सकल शरण, मनमोहन, सृजन तूच, तूच विलय