Wednesday, April 30, 2008

समर्थ रामदास स्वामींनी केलेले शिवथर घळीचे वर्णन..

समर्थ रामदास स्वामींनी केलेले शिवथर घळीचे वर्णन..

गीरीचे मस्तकी गंगा ।
तेथुनि चालिली बळे ।
धबाबा लोटती धारा ।
धबाबा तोय आदळे ॥ १॥

गर्जतो मेघ तो सिंधु ।
ध्वनि कल्लोळ उठीला ।
कड्यासी आदळे धारा ।
वात आवर्त होतसे ॥ २॥

तुशार उठती रेणु ।
दुसरे रज मातले ।
वात मिश्रीत ते रेणु ।
सीत मिश्रीत धुकटे ॥ ३॥

दराच तुटला मोठा ।
झाड खंडे परोपरी ।
निबीड दाटली छाया ।
त्यामधे वोघ वाहाती ॥ ४॥

गर्जती स्वापदे पक्षी ।
नाना स्वरे भयंकरे ।
गडद होतसे रात्री ।
ध्वनीकल्लोळ उठती ॥ ५॥

कर्दमु निवदेना तो ।
मनासी साकडे पडे ।
विशाळ लोटली धारा ।
ती खाली रम्य विवरे ॥ ६॥

कपाटे नेटक्या गुंफा ।
तापसी राहती सदा ।
नेमस्त बांधली नाना ।
उत्तमे निर्गळे स्थळे ॥ ७॥

विश्रांती वाटते तेथे ।
जावया पुण्य पाहिजे ।
कथा निरुपणे चर्चा ।
सार्थके काळ जातसे ॥ ८॥

मैत्रीचे एक नाते असते.

मैत्रीचे एक नाते असते.

नकळ्त ते जुळ्त जाते.

त्याच्यात सगळे माफ़ असते.

त्यातून ते फ़ुलत जाते.

असू शकते वयात अतर

असू शकते त्यात मतातर

तरीही नाते रहाते निरतर

मदतीला धावून येते

कौतुकाची पावती देते.

मैत्रीचे नाते घट्ट करते.

आनद द्विगुणीत करते.

रग जात कुळ मैत्रीत नसते.

ती कित्येक रुपात जडते.

मैत्रीमुळे जीवनास रगत येते.

ही सवाना हवी असते.

एक प्रवास मैत्रीचा

एक प्रवास मैत्रीचा
एक प्रवास मैत्रीचा
जश्या हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येवुन जावी
अन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी..

एक प्रवास सहवासाचा
जणु अलगद पडणार-या गारांचा
न बोलताही बरच काही सांगणारा
अन स्पर्श न करताही मनाला भिडणारा..

एक प्रवास शुन्याचा
जणु हीमालयाशी भिडण्याचा
शुन्यातुन नवे जग साकारणारा
अन नव्या निर्मितीची चाहुल देणारा..

एक प्रवास जगण्याचा
क्षणा क्शणाला माणुस घडवण्याचा
हसता हसता रडवणारा
अन रडवुन हळुच हसवणारा..

एक प्रवास प्रेमाचा
भुरभुरणार-या दोन जिवांचा
जिंकलो तर संसार मांडायचा
अन हरलो तर नवीन वाटा शोधायच्या..

एक प्रवास प्रयत-नांचा
सुख़ दुख़ातील नाजुक क्षणांचा
अखंड घडवणार-या माणुसकीचा
अन नवी उमेद देणार-या घडींचा..

एक प्रवास..
तुमच्या आमच्या आवडीचा
साठवु म्हंटले तर साठवणींचा
आठवु म्हंटले तर आठवणींचा
इथे हळुच येवुन विसावलाय..एक प्रवास

मासळी बाजार.......

मासळी बाजार.......

ये दादा हाकडं ये, बघ ताजा वाटा लावलाय......
अरे ये, बघ तर.........इस रुपयेच हाय......

अरे घे, कोनाकडेच असा मिलायचा नाय
आनी माका ठावुक हाय, तू घेतल्या बीन रावूचा नाय

पापलेट नाय सुरमय नाय ताजा ताजा वाटा हाय
इस लाच बघ दिला अकलेचा हां वाटा हाय......

ये माझ्या चिकन्या झिला, एक तरी घे......
आऊशिक बोल ज़रा मसाला लावून दे


ऐश्वर्या हाय, करीना हाय.....बिपाशा हाय, राखी पन हाय
त्या नको घेवूस.......खिशाला तुज्या परवडायच्या नाय...

बापूंची हाय, नेहरूची हाय, विवेकानंद हाय, नेताजी बी हाय.....
कनची हवी बोल, एकच घे.......समदया पचायच्या नाय......

अरे ये, असा परत मिलायचा नाय.....
आनी माका ठावुक हाय, तू घेतल्या बीन रावूचा नाय

चांदण्यात फिरताना माझा धरलास हात

चांदण्यात फिरताना माझा धरलास हात
सखया रे आवर ही सावर ही चांदरात

निजलेल्या गावातून आले मी एकटीच
दूर दिवे कळलावे पडले मागे कधीच
या इथल्या तरुछाया पण सारे जाणतात

सांग कशी तुजविणाच पार करु पुनवपूर
तुज वारा छळवादी अन् हे तारे फितूर
श्वास तुझा मालकंस, स्पर्श तुझा पारिजात

जाऊ चल परत गडे, जागले न घर अजून
पण माझी तुळस तिथे गेली हिरमसून
तुझिया नयनात चंद्र, माझ्या हृदयी प्रभात

कुणीच आपल नसतं..........

कुणीच आपल नसतं..........

कुणीच आपल नसतं
मग आपण कुणासाठी असतो
आपलं हे क्षणिक समाधान
इथ प्रत्येक जण एकटा असतो

शब्दांनाहि कोड पडावं
अशीही काही माणस असतात
किती आपलं भाग्य असत
जेव्हा ती आपली असतात

अस्तित्वाची किंमत
दूर गेल्याशिवाय कळत नाही,
सगळ कळतय मला
पण तुला सोडून दुरही जाववत नाही

जिवनात काहितरी मागण्यापेक्षा
काहितरी देण्यात महत्व असत
कारण मागितलेला स्वार्थ
अन दिलेलं प्रेम असतं

कधी कधी जवळ
कुणीच नसावसं वाटतं
आपलं आपण
अगदी एकट असावसं वाटत....

मराठी पाउल पडते पुढे

स्वराज्य तोरण चढे गर्जती तोफ़ांचे चौघडे
मराठी पाउल पडते पुढे.
माय भवानी प्रसन्न झाली, सोनपावले घरास आली आजच दसरा आज दिवाळी
चला सयांनो अंगणी रेखु कुम्कुम केशर सडे
मराठी पाउल पडते पुढे.
पक्षी आम्ही वीर उद्याचे, बाळमुठीला बळ वज्राचे वारस होवु अभिमन्युचे
दूध् आईचे तेज प्रवाहे नसतुनी सळसळे
मराठी पाउल पडते पुढे
स्वये शस्त्र देशर्थ हाती धरावे
टिकावे रणी वा लदुनी मरावे
तुझ्या रक्षणा तुच रे सिद्ध् होसी
तुझ्या संकटी देव धावून येती
जय जय रघुवीर समर्थ
शुभ घडीला शुभ मुहुर्थी
सनई सांगे शकुन वंदिं
जय भवनी जय भवनी
दशदिशांना घुमत वाणी
जयजयकरे दुमदुमती हे सह्याद्रीचे कडे
गर्जती तोफांन्चे चौघडे
मराठी पाउल पडते पुढे
मराठी पाउल पडते पुढे

हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत

हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत
"इश्श…" म्हणुन मान खाली घालतच नाहित,
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत

"नविन ड्रेस का ग?" विचारले तर ह्यांना येतो संशय
"नाहि रे जुनाच आहे", म्हणुन बदलतात विषय
नकट्या नाकावर लटका राग दिसतच नाही
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत

मी घा-या डोळ्यांचे कौतुक करावे
मग तिनेही खुदकन हसावे
कशाचे काय….आजकाल गालांना खळ्या कशा पडतच नाहि
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत

उद्या घोड्यावर होऊन स्वार येईल एक उमदा तरूण
होशिल का माझी राणी विचारेल हात हातात घेऊन
गोड गॊड स्वप्ने यांना आता पडतच नाही
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत

पोर लग्नाची झाली म्हणुन, घरी आई-बाप काळजीत
"माझा नवरा मी कधीच शोधलाय" त्या डीक्लअर करतील ऎटित
घरून होकारासाठी कधी थांबतच नाहित
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत......

हवी कशाला साथ कुणाची,

हवी कशाला साथ कुणाची,
माझेच आकाश अन् माझी धरती...
असाच एकटा चालत राहीन,
आभाळ घेऊनी खांद्यावरती...

उडत्या पाखरांना
परतीची तमा नसावी
नजरेत सदा
नवी दिशा असावी
घरट्याचे काय आहे
बांधता येईल केव्हा ही
क्षितीजांच्याही पलीकडे
झेप घेण्याची जिद्द असावी.........




तकदीर बनानेवाले तूने कमी न की,
अब किसी को क्या मिला ,
ये तो मुकद्दर की बात है ।

माज्या स्वप्नातल आयुष्य मी

माज्या स्वप्नातल आयुष्य मी
आंदन म्हणुन तुला दिल
कारण तुज्यापलिकडे सुद्धा जग आहे
हे मला तेव्हा नाही कळल
`

संकटांना कधी कंटाळायचं नसतं,

संकटांना कधी कंटाळायचं नसतं,
त्याला सामोरच जायचं असतं
कोणी नावे ठेवली तर थांबायच नसतं
आपलं चांगलं काम करायचं असतं
अपमानाने कधी खचायचं नसतं
जिद्दीने बळ वाढवायचं असतं
नाराज मुळीच व्हायचं नसतं
चैतन्य सदा फ़ुलवायचं असतं
पाय ओढले म्हणुन परतायचं नसतं
पुढे अन पुढे जायचं असतं
लोक निंदेला कधी घाबरायचं नसतं
आपलं सामर्थ्य दाखवायचं असतं
रागात कोणाला बोलायचं नसतं
प्रेमाने मन जिंकायचं असतं
जीवनात खुप करण्याजोगं असतं
आपलं फ़क्त तिकडे लक्ष नसतं

आठवणींशी नातं जडतं...

आठवणींशी नातं जडतं...
जुन्या वहीची पानं चाळताना
मोरपीस हातात पडतं
मोरपीस गालावर फ़िरताना
आठवणींशी नातं जडतं

या आठवणींत बुडुन जाताना
आजचं नाही उरत भान
क्षण ते परत ना येतील आता
तीच होती सुखाची खाण

आठवणी असतात अनेकांच्या
तुमच्या, माझ्या, सर्वांच्या
प्रत्येकाची असते एकतरी आठवण
दु:खाची अथवा सुखाची साठवण

माझ्याही आहेत अशाच आठवणी
पालटुन गेलेल्या भुतकाळाच्या
जीवन झाल्या त्याच आठवणी
सुवर्णरुपी गतकाळाच्या
ह्रुदयात या रुजुनि गेल्या
काही त्यातल्या बुजुनही गेल्या
मनात काहींनी घर केले
पण...
क्षण आता ते उडुन गेले

आठवणी आठवाव्या लागत नसतात
आपोआप त्या आठवत असतात
पालटुन गेलेल्या सुंदर जीवनाचे
सुंदर क्षण भेटीस पाठवत असतात....

अशीही मैत्रिण नशिबानेच लाभावी

अशीही मैत्रिण नशिबानेच लाभावी
समोर आलॊ की थोडीशी हड्बडावी,

बोलली नाही तरी आपल्याकडे बघून गोड हसावी.

चालता चालताच पाठून तिनं हाक मारावी,

घर जवळ येताच पुढे निघून जावी.

आपण नसलॊ की थोडीशी हिरमूसावी,

दिसलो की गालवर छान खळी पडावी.

कधी हसता हसताच ती रडावी,

कधी रडता रडताच खुद्कन हसावी.

हक्काने आपल्यावर रागवावी,

मग कही न बोलताच निघून जावी.

नंतर चूक कळल्यावर नुसता मिसकॉल द्यावी,

आपण कॉल केल्यावर मात्र मुद्दाम तो कट्‌ करावी.

सकाळी भेटल्यावर हीचकीचत बोलावी,

निरागस चेहऱ्याने मग माफ़ी मागावी.

लेक्चर ला नसलो तर तिने प्रेसेन्टी लावावी,

वाढदीवसाच्या पार्टीला मात्र नेहमी अबसेन्ट असावी.

ती आनंदात असली की घडघडुन बोलावी,

नाहीतर थोडीशी अबॊल रहावी.

सुखात सगळ्यांना सामिल करावी,

व्यथा फक्त माझ्याकडेच बोलावी.

बाहेरगावी कुठे गेलो तर तिची आठवण यावी,

आठवण काढताच तिला मात्र उचकी लागावी.

परत आल्यावर हसतानाही डोळ्यात पाणी भरावी,

"साधा एक फोनही केला नाही!" म्हणत रुसुन बसावी.

थोडा वेळ मग ती शांत रहावी,

पुढच्याच क्षणाला "माझ्यासाठी काय़ आणले?" म्हणुन विचारावी.

"मधुधुंद गंध, बेधुंद हवा....."

"मधुधुंद गंध, बेधुंद हवा....."

मधुधुंद गंध, बेधुंद हवा
मोरपिसी स्पर्श नवा....
सोड ना हात साजणा....
मंद कर ना रात दिवा....

कीणकिणतॉ बघ चुडा
चांदण्यांचा शेज सडा...
नजरेचे भलतेच इशारे
श्वासांचा आवाज चढा...

शाश्वतीचे वरदान असे
या क्षणांना चढलेय पिसे...
बेभान मदमस्त निशेत
देहभान सांग का नसे??..

काजळ अलवार विखुरले
स्वप्न समीप अवतरले.....
चढत्या भावनांचे काहूर
बाहुपाशात तुझ्या निवळले...
बाहुपाशात तुझ्या निवळले.....

असे आहोत आम्ही... बिन्धास्त मराठी...

असे आहोत आम्ही... बिन्धास्त मराठी...

आहो आम्हीच ते वीर मराठी
म्हणतात आम्हाला बिन्धास्त मराठी..

गप्पा गोष्टी अन ग़ॉसिप इथे चालती,
मैत्रीच्या या बीजाला स्नेहपालवी अंकुरती..

कधी उडतात इथे खटके अन कधी वादविवाद होती,
सवांदाच्या या कळ्या मनामनातून उमलती..

येतात पाखरे इथे अशी गरूड झेप घेवूनी,
आपल्याच तालात इथे घिरट्या घेती...

कधी इथे जमतो वर्ग बालपणीच्या शाळेचा
मग गुंफला जातो एक एक मोती आठवणीचा..

कधी कधी पाय खेचतात वर जाणार्‍याचे,
अन म्हणातात इथे सर्वानांच सोबत घेवून जायचे...

इथली पोरं लाईन मारायचा चान्स अजिबात सोडत नाही,
जुळतात इथे नाती प्रेमाची तेव्हा ती कधीच मोडत नाही...

भेटतात सारे एकत्र येथे अन धमाल उडवतात
विसरून सारे वैर आपसातले एकीचा मेळा भरवतात..

अश्या या बिन्धास्त मराठीला तुमचाही सहभाग असावा..
मराठीच्या या नंदनवनात तुमचा बिन्धास्त आस्वाद असावा...

फुले शिकवतात......,

फुले शिकवतात......,
गुलाब सांगतो,
येता जाता रडायचं नसतं,
काट्यात सुध्दा हसायचं असतं;

रात रानी म्हणते,
अंधाराला घाबरायचं नसतं,
काळोखात ही फुलायचं असतं;

सदाफुली सांगते,
रुसुन रुसुन रहायचं नसतं,
हसुन हसुन हसायचं असतं;

बकुळी म्हणते,
सवळ्या रंगाने हिरमुसायचं नसतं,
गुनाच्या गंधाने जिंकायचं असतं;

मोगरा म्हणतो,
स्वत:चा बडेजावपणा सांगायचा नसतो,
सदगुनांचा सुगंध मैलवरुन ही येतो;

कमळ म्हणतो,
संकटात चिखलात बुडायचं नसतं,
संकटांना बुडवुन फुलायचं असतं

आई साठी काय लिहू

आई साठी काय लिहू
आई साठी कसे लिहू
आई साठी पुर्तिल एवढे, शब्द नाहीत कोठे
आई वर्ती लिहन्येत्पत, नाही माझे व्यक्तिमत्व मोठे,

जीवन हे सेत आई म्हणजे विहिर
जीवन हे नौका तर आई म्हणजे तीर
जीवन हे शाला तर आई म्हणजे पाटी
जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी,

आई तू उन्हा मधील सावली
आई तू पावसातिल छतरी
आई तू थान्तिटली शाल
आता यावित दुखे खुशाल,

आई म्हणजे मंदिराचा उंच कलस
आई म्हणजे अन्गानातिल पवित्र तुलस
आई म्हणजे भजनात गुन्गुनावी आसी संतवानी
आई म्हणजे वाल वन्तात प्यावा अस ठंदगार पानी

जाते म्ह्न्तेस हरकत नाही,

जाते म्ह्न्तेस हरकत नाही,
काढत आश्रु पाहून जा,
नाते तोड्तेश हरकत नाही,
विझता स्वाश पाहून जा,
जानुण सारे सम्पवताना,
हीच येवडी विनंती,
हसते आहेश हरकत नाही,
बुद्ति नाव पाहून जा,
जालते आहेश हरकत नाही,
जल्नारे गाव पाहून जा,

आईलाही 'मन' असतं, अम्हाला कधी समजलंच नाही

आईलाही 'मन' असतं, अम्हाला कधी समजलंच नाही
तिचं सूध्धा 'स्वप्न' असतं,अम्हाला ते कळालंच नाही

'आई' राबते दिन्-रात्र, आम्हाला घडवण्यासाठी
आम्ही असतो विचार मग्न, आमुच्याच स्वार्थासाठी
आईच 'श्रेष्ठ गुरु' असते, अम्हाला कधी समजलंच नाही
तीच आमुचा आधार असते, अम्हाला ते कळालंच नाही

'आई' झोपते उपाशी पोटी, आमचं पोट भरण्यासाठी
आम्ही सदा पैशे उडवतो, अमुच्याच हवसेपोटी
आईच्या सूध्धा 'आवडी' असतातं,अम्हाला कधी समजलंच नाही
तिलां सूध्धां 'हसायचं' असतं, अम्हाला ते कळालंच नाही

'आई' नेसते फाटकं लुगडं, आम्हाला सजवन्यासाठी
आम्ही सादा रागावतो तिच्यावर,आमुच्याच चूकीसाठी
आईलाही 'जगायंचं' असतं, अम्हाला कधी समजलंच नाही
तीच खर 'धन' असतं,अम्हाला ते कळालंच नाही.

आईलाही मन असतं, अम्हाला कधी समजलंच नाही
तिचं सूध्धा स्वप्न असतं,अम्हाला ते कळालंच नाही

आयुष्याची रेसिपी

आयुष्याची रेसिपी

फार अवघड नाही आहे साधी सोपी,
सांगतो आज मी माझ्या आयुष्याची रेसिपी,

भात भाजी डाळ पोळी सगळे साग्रसंगीत आहे ,
जिभेवर रेंगाळेल अशी नक्कीच चव आहे,.

समाधानाची नरम पोळी , सोबत नवनवीन स्वप्नांची भाजी
प्रामणिकतेचा उबदार भात, मायेपरि गोडी वारणाची,

फोडणी त्यावर आठवणींची, आशेच्या तूपाची धार,
सुखाचे मीठ पेरलेय, महत्वाचे आहे फार,

आंबट गोड नात्यांचे लोणचे, पाणी सुटतेय तोंडाला,
सोबत पापड ही आहे थोडीशी कुरकुर करायला,

काय म्हणता.?..मसाले ... ते कसा विसरेन मी,
राग, लोभ, तिरस्कार, मत्सर, थोडेच घालेन म्हणतो मी,

रेसिपी संपली असे समजू नका , एवढ्यावर जेवण पूर्ण नाही,
दुखाच्या पाण्याचा ग्लास भरल्याशिवाय आयुष्याला अर्थ नाही,

रोज तृप्त होऊन असाच मी जेवणार आहे,
पदार्थ कदाचित बदलतील पण ताट तेच राहणार आहे.........!!!

एकही मित्र नाही असा माणूस कुठेच नसेल

एकही मित्र नाही असा माणूस कुठेच नसेल
थोड्या पुरती का होईना प्रत्येकाने मैत्री केली असेल


शरीरात रक्त नसेल तरी चालेल पण आयुष्यात मैत्री ही हवीच
कितीही जुनी झाली तरी ती नेहमी वाटते नवीच

रक्ताच्या नात्यात नसेल एवढी मैत्रीच्या नात्यात ओढ असते
कशीही असली तरी शेवटी मैत्री गोड असते.


मैत्री म्हणजे त्याग आहे मैत्री म्हणजे विश्वास आहे
हवा फक्त नावापुरती तर मैत्री खरा श्वास आहे


मैत्रीच्या या नात्या बद्दल लिहिण्यासारखे खूप आहे
खरे नात्याला नसले तरी मैत्रिला एक रूप आहे


मैत्रिला कधी गंध नसतो मैत्रीचा फक्त छंद असतो
मैत्री सर्वानी करावी त्यात खरा आनंद असतो

पण जाऊ दे जमलंच नाही ..!

रोज संध्याकाळी तिला चौपाटीवर फिरवायला ,
तिच्या निळ्या डोळ्यांत स्वतःला हरवायला ,

वाळूत बंगला बांधता बांधता..
आलं असतं मनातलं सांगता..

पण जाऊ दे जमलंच नाही ..!

आपल्यालाही आवडलं असतं..

कधीतरी तिच्यासोबत बागेमध्ये जायला ,
एकच कॅडबरी दोघांमधे वाटून खायला ,

कधी खोडी काढली असती..
आणखी गोडी वाढली असती..

पण जाऊ दे जमलंच नाही ..!

आपल्यालाही आवडलं असतं...
तिचा हात हळुवारपणे आपल्या हातात घ्यायला ,
लता-रफ़ी, किशोर-आशा ड्युएट गाणं गायला ,

सूर कदाचित जुळले असते..
तिला मनातले कळले असते..

पण जाऊ दे जमलंच नाही ..!

आपल्यालाही आवडलं असतं...

निघताच निघता तिला बावरलेलं पाहायला ,
मला तिची ,तिला माझी शपथ वाहायला ,

माझे अश्रू माझ्या डोळ्यांत लपले असते..
तिचे मात्र दवासारखे जपले असते..

पण जाऊ दे जमलंच नाही ..!

प्रेम मागुन मिळत नाही

प्रेम मागुन मिळत नाही
प्रेम वाटावं लागतं
ध्यानी मनी नसताना
अवचित भेटावं लागतं

माझ्यावर प्रेम करा
असं म्हणता येत नाही
करु म्हटल्याने
असं काही होत नाही

त्यासाठी जुळावे लागतात
उभयंताचे धागे
भीड आणि भीती मग
आपोआप पडते मागे

प्रेमाचे फुलपाखरु
स्वच्छंद उडतं
मनमोही रंगानी
पुरतं वडं करतं

पण त्यामागे धावलं तर
आणखी पुढे पळतं,
डोळे मिटुन शांत बसलं
की हळुच खांध्यावर बसतं !!

किती दिवस - आणखी किती वर्षं..

एका ओंजळीत आयुष्य घेऊन जगतो मी
आणि ओंजळीतून थेंब थेंब गळून जावा
तसं आयुष्यही निसटून जातं क्षण क्षणाने
किती काही करायचं राहिलय..
आणि कुणास ठाऊक.. अजून किती जगायचं राहिलय..
कसं नेणार तडीस मी - जे मनात कुठेसं योजलय..
किती जगणार मी - विधात्याने तरी अद्याप कुठे मोजलय..........
----------------------------------------------------
कमी पडतय मला ओंजळीतलं आयुष्य जगायला
रात्रंदिवस असे का माझे भुर्रकन लागले उडायला

ओंजळ कित्ती घट्ट केली
मी मूठही वळून पाहिली
कित्येक दिवसरात्रींची
मग धार होऊन वाहिली

येणारा प्रत्येक दिवस म्हणून आता नव्यानं जगायचं ठरवलय
ओंजळीतून वाहून जाणारा काळ पदरात सांभाळायचं ठरवलय

किती दिवस - आणखी किती वर्षं.. प्रश्न नाही विचारायचा..
असूदेत कितीही.. तमा कशाला..
आता येणारा क्षणन क्षण अगदी कणा-कणाने वेचायचा...........

असाव कुणीतरी...................

असाव कुणीतरी......
आपल्या हाकेला 'ओ' देणार.....
रिमझिंत्या पावसात हळूच छत्रीत बोलावनार..

असाव कुणीतरी......
आपल्या सोबत चालणार..
चांदण्यात फिरताना हातात हात घेणार..

असाव कुणीतरी......
कधी वाद घालणार..
खोटा रुसवा आणून, पुन्हा आपल्यावरच रागवणार..

असाव कुणीतरी......
मनमोकळ बोलणार..
काहीही न सांगता, अगदी मनातल ओळखणार..

असाव कुणीतरी......
खूप काही विचारणार..
लहान लहान गोष्टीसाठी शपथ घालणार..
असाव कुणीतरी...................

आज राज ठाकरे (साहेब) यानी मराठी माणसाचा मुद्दा उचलला

प्रत्येक माणसाला आपल्या देशाचा अभिमान असतो; तसाच त्याला त्याच्या राज्याचा, भाषेचा ही अभिमान असने स्वाभाविक आहे.
आज राज ठाकरे (साहेब) यानी मराठी माणसाचा मुद्दा उचलला; राज साहेब याना पण मराठी भाषे बद्दल अभिमान आहे, आणि असाच अभिमान महाराष्ट्रात रहनारयाला असला पाहिजे, मग तो महाराष्ट्रतला मराठी मानुस असो वा परप्रन्ति.
आज बाहेरचे लोक मुम्बई मधे येउन मराठी माणसाला कमी लेख्तात, मग मराठी मानुस तरी किती शांत बसणार. त्यात मुम्बई मधे आज इतकी मानस भरली आहेत, की येथे नोकरी भेटत नाही. त्यात u.p.,बिहारी यांची दादागिरी किती सोस्नर मराठी मानुस.
आज राज सहेबानी मराठी मनसा साठी काही केले,तर राज सहेबांच काय चुकल.जर आज या मराठी मानसाच काही चुकल असेल तर ठीक आहे, ही चुक आम्ही (राज साहेब आणि मराठी मानुस) पुन्हा- पुन्हा करू आणि करणार.
इतिहास गवा आहे जेव्हा-जेव्हा मराठी मानुस बोलतो ती गोष्ट खरी करून दाखवतो.
याना (u.p., बिहारिना) तर आम्ही हे दखुनच देऊ.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!

हिच असे माझी आई

पदर कसून ती स्वार स्कूटरवर
पाठी तिच्या मी मजेत निर्भीड
काय कशाची कसली चिंता
सोबत माझी आई असता

चाकोरीच्या पुढती जाऊनी
शिकवी आम्हा छंद नवे
खेळ नवे अन काम नवे हे
यापरी अजूनी काय हवे

सळसळता उत्साह तिचा हा
देई आम्हा स्फूर्ती नवी
नाही दिसली कधीच थकली
आई माझी सदा नवी

थोरांमधे नाही रमली
बालांमधे बाल मात्र ती
बालजनांचा मेळावा हा
वागवीत ती सदा भोवती

मऊ भातावर धार तुपाची
खमंग पिठले, चटणी जराशी
अजब तृप्त ती करुन आम्हा
देई तिची ऊबदार कुशी

देणारा हा हात तिचा तो
कधी न पसरला कुणापुढे
प्रत्येकाला हात मदतीचा
देण्या ती हो सदा धडपडे

थकली आता जरी जराशी
चाल मंदही झाली खाशी
तरुणाईला लाजवणारी
हीच असे आई माझी

मुलांवरी या उधळूनी जीवन
विसरुन जाऊन दु:ख उरातून
जीवनसाथी नसतासोबत
तयार केले आम्हा घडवून

सदा हसतमुख असणारी ती
उतारवयी हळवी होई
बांधलेल्या वास्तूचा हा
कळस पाहूनी तॄप्त होई

घाव उराचे झाकून ठेवून
जीवन पुढती चाले जी
स्वयंसिद्धा अन आत्माभिमानी
हिच असे माझी आई
हिच असे माझी आई

गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस

गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..

तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..

मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..

समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..

विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप.. मध्येच माघार घेऊ नको

मैत्री कशी ह्ळुवार उमलते

मैत्री कशी ह्ळुवार उमलते
उन्हातही मग सावली वाटते
अश्रूत दु:ख वाहून जाते
व्यथांनाही ह्सू येते
मैत्रीविना सारेच फिके
आनंदाचे क्षणही मुके
म्हणूनच मैत्रीला फुलवायचे
फुलासारखे जपायचे
अन त्या सुगंधात
जीवन सुगंधी करायचे

जी माणसे हवीशी वाटतात
ती कधी भेटत नाही
जी माणसे नकोशी वाटतात
त्यांचा सहवास संपत नाही
ज्यांच्याकडे जावेशे वाटते
त्यांच्याकडे जायला जमत नाही
ज्यांच्याकडे जाऊ नये असे वाटते
त्यांच्याकडे जावेच लागते
जेंव्हा जीवन नकोसे वाटते
तेंव्हा काळ संपत नाही
जीवनामध्ये सुरुवातीस ज्यात अथ नाही असे वाटते,
त्यातच खूप अथ भरलेला आहे असे आयुष्याच्या शेवटी कळते
जेंव्हा जीवनाचा खरा अथ कळतो
तेंव्हा काळ संपलेला असतो
नशीब हे असच असते
त्याच्याशी जरा जपून वागाव हात
हवा असतो प्रत्येकाला प्रत्येकाचा
साथ हवी असते प्रत्येकाला प्रत्येकाची
पण जेव्हा तो हात नकोसा होतो
तेव्हा नकोशी होते ती साथ त्या साथीदाराची

नाती जोडता जुळवता प्रेम जडते
साय्रा जगाला सोडून प्रीती ह्रुदयात दडते
तुटतात जेव्हा ही नाती,ती जुळवणे होते कठिण
तुकडे होतात जेव्हा त्या ह्रुदयाचे,त्याला जोडणे होते कठिण

मैत्री

कोसळणारा पाऊस पाहुन
मला नेहमीच एक प्रश्न पडतो
माझं तर ठीक आहे
पण हा कुणासाठी रडतो
दव पडलेल्या गवतावरून
जेव्हा मी हात फ़िरवतो
तुझे अश्रू पुसतोय
आसाच मला भास होतो
गोडीगुलाबी अन थोडासा रुसवा,
खुप सारे प्रेम अन थोडासा राग हवा,
नको अंतर नको दुरावा
पावसाला लाजवील, असा
असावा मैत्रीत ओलावा
मैत्री नको चंद्रा सारखी,
दिवसा साथ न देणारी,
नको सावली सारखी सदा पाठ्लाग करणारी
मैत्री असावी अश्रुन सारखी सदा सुख दु:खात साथदेणारी !!!!

!!!!....कधीतरी असेही जगून बघा....!!!!

माणूस म्हणून जगताना
हा एक हिशोब करुन तर बघा!
"किती जगलो" याऐवजी "कसे जगलो"?
हा एक प्रश्न जरा मनाला
विचारुन तर बघा!
कधी असेही जगून बघा.....

कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी
समोरच्याचा विचार करुन तर बघा!
तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी
न आवडलेल्या विनोदावरही
हसुन तर बघा!
कधी असेही जगून बघा.....

संकटांमुळे खचून जाणारे तर
शेकडोंनी मिळतात
कधीतरी अडचणींवर मात
करण्याची हिम्मत दाखवुन तर बघा!
स्वतःपुरता विचार तर
नेहमीच करतो आपण
कधीतरी बुडत्या्साठी
काठीचा आधार होउन तर बघा!
कधी असेही जगून बघा.....

वर्तमान आणि भवि्ष्याची
चिंता तर सदाचीच असते
कधीतरी भूतकाळाच्या
वि्श्वात गुंगून तर बघा!
काळाची वाळू हातातुन
निसटली म्हणुन काय झाले?
आधी अनुभवलेला क्षण पुन्हा
एकदा जगून तर बघा!
कधी असेही जगून बघा.....

प्रतिसादाची काळजी का
करावी नेहमी?
एखाद्यावर
जिवापाड,निर्मळ,एकतर्फी
प्रेम करुन तर बघा!
ज्या प्रेमाबद्दल सर्व जग
कुतूहल करते
त्या अथांग भावनेची
व्याख्या करुन तर बघा!
कधी असेही जगून बघा....

परत घेवून जाईल मला तोच दरवळणारा मॄदगंध

हरवलंय सारं, जे अनुभवलं होतं कधी..
आता आहेत केवळ आठवणीं,
काही कडू काही गोड ...

आठवतात अजून ते
आजीच्या हातचे दहिपोहे,
घुमतात आजुनही कानात
देवघरातले आजोबांचे दोहे ...

दरवळतो आहे अजून हवेत
बागेतल्या त्या पहिल्या मोगîयाचा सुगंध,
पावसात चींब भिजलेल्या धरेचा
तो सुखावणारा परिमल मंद ...

आंबले आहेत दात अजून
त्या हिरव्याकंच कैरिने,
भिजून शहारलंय मन आतुर
श्रावणातल्या त्या पहिल्या सरीने ...

कुठे गेल्या त्या संध्याकाळच्या
शुभंकरोति अन रामरक्षा,
हरवला का तो वासुदेव
अन त्याला दिलेली भिक्षा ...

पण खात्री आहे मला
सापडतील सगळ्या गोष्टी हरवलेल्या ...
तो आजीचा हस्तस्पर्श, ते दहिपोहे, देवघरातले दोहे, त्या टवटवीत मोगîयाचा गंध ...

परत घेवून जाईल मला तोच दरवळणारा मॄदगंध

साथ हवी असते प्रत्येकाला प्रत्येकाची

हात हवा असतो प्रत्येकाला प्रत्येकाचा
साथ हवी असते प्रत्येकाला प्रत्येकाची
पण जेव्हा तो हात नकोसा होतो
तेव्हा नकोशी होते ती साथ त्या साथीदाराची

नाती जोडता जुळवता प्रेम जडते
साय्रा जगाला सोडून प्रीती ह्रुदयात दडते
तुटतात जेव्हा ही नाती,ती जुळवणे होते कठिण
तुकडे होतात जेव्हा त्या ह्रुदयाचे,त्याला जोडणे होते कठिण

आत्मविश्वास असतो एकमेकांना एकमेकांवर
अनेकांना आपल्या आणि आपल्यांवर
जेव्हा उठतो तो विश्वास स्वत:च्याच आत्म्यावरूनच
नाही उरत कोणी आपले नाही उरत कोणी कोणाचे

आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतात अनेक प्रसंग
अनुभवत असतो तो अनेक अनुभव येता जाता
अनेक वाईट असतात थोडेसे चांगले असतात
असाच काहीतरी म्हणे माणूस घडत असतो

खचू नका असे प्रसंग येता जाता
भय नामक राक्षसाला तारणारे
आत्मविश्वासाचे ब्रम्हास्त्र निर्माण करत राहा
आपल्या आयुष्याचा हिमालय असाच आत्मविश्वासाने चढत राहा ...

जगाव असे की.....

मला स्वच्छंदी निखळ,
कुणाचंही मन न दुखवता, हसत खेळत
सरळ साधं आयुष्य जगायला
आवडत. माझ्या भावनांशी आणि
तत्वांशी प्रामाणिक राहणं
मला प्रिय आहे

हे जीवन सुंदर आहे.
आणि हे सुंदर आयुष्य
तितक्याच सुंदरपणे
जगण्याचा प्रयत्न करणे.
बाकी काय !

आयुष्याचं गणित इतकं सोपं
कधी नसतच मुळी......
कारण नेहमीच दोन आणि दोन चार
होत नसतात..
कधी कधी तीच बेरीज तीन
चतुर्थाश सुद्धा होते..
ती बेरीज चारच व्हावी असा
अट्टहास कधीच धरायचा नसतो....
एवढं साधं सूत्र लक्षात
ठेवून जर आयुष्य जगलं तर
त्यात खूप सुख असतं....

जगाव असे की
मरताना प्रत्येक हृदयाने
साद द्यावी
नेता नेता मरणानेही आपल्या
जीवाला दाद द्यावी...... !

वेळ् आली आहे उडन्याची

हरु नको,खचु नको
वेळ् आली आहे उडन्याची
आहे पन्खाना आकाशवेध
मग भिती का पडन्याची?

शब्द ही आम्हाला पुरत नाहीत

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
बोलायच खुप असत मला
पण बोलणं मात्र जमत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
दुखवल जात आम्हाला
दुखवता आम्हाला येत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
खोट खोट हसता हसता
रडता मात्र येत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
दुःखात सुख अस समजता
दुःख ही फिरकत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
मांडायचा प्रयत्न करतोय
पण शब्द ही आम्हाला पुरत नाहीत

हे कधी विसरू नको

दोन चिमण्या भेदरलेल्या

वादळ वाऱ्याला घाबरलेल्या

थरथरणारं काळीज घेऊन

वळचणीला बसलेल्या

चिमणी म्हणाली चिमण्याला

कशी तोंड देऊ या तुफानाला

वाटते मज भीती आता

होणार काहीतरी जिवाला

चिमणा म्हणाला चिमणीला

भिऊ नको घाबरू नको

मी आहे ना

तुझ्या संगतीला सोबतीला

पुन्हा पंखांत बळ येईल

दुबळं का होईना

थोडसं उडता येईल

तुला मला लागेल इतका

चिमणचारा मला

नक्कीच आणता येईल

पुन्हा सांगतो दु:ख करू नको

जे तुझं नाही त्याकडे पाहू नको

मी तुझ्यासाठी आणि तू माझ्यासाठी

हे कधी विसरू नको

पडायच असत प्रेमात कधी कधी

सुंदर जीवनात कधी कधी..

पडायच असत प्रेमात कधी कधी

बघायच असत झुरुन दुसर्‍यासाठी कधी कधी..

पाहताना तिच्याकडेच दाखवायच असत

विचारात गुंतल्यासारख कधी कधी

अन पाहताना तिच्याकडेच

विचारात गुंतायच असत कधी कधी..

रात्री पहायची असतात स्वप्ने तिचीच...

जागुन अशी रात्र काढावी कधी कधी

नंतर "जागली होतिस का रात्री?"

म्हणून विचारावे कधी कधी..

मागायचा असतो देवाकडे..

हात तिचा चोरुन कधी कधी

द्यायच असत आश्वासन त्यालाही

पाच रुपयाच्या नारळाचे कधी कधी..

चुकवायच्या असतात नजरा सर्वांच्या

विषय तिचा निघाल्यावर कधी कधी

असते रागवायचे लटकेच

"अस काही नाहिये" म्हणून कधी कधी

विरहात तीच्या ...

असते रडायचे गुपचुप आतुन कधी कधी..

पाहुन हात तिचा दुसर्‍या हाती ..

असते हसायचे लपवुन दुख: कधी कधी..

पडायच असत प्रेमात कधी कधी

बघायच असत झुरुन दुसर्‍यासाठी कधी कधी...

ही आयुष्याची "गेम" असते...

अरेंज मॅरेज......एक ब्लाइण्ड गेम

पत्त्यांची जशी नेहमी "ब्लाइण्ड गेम" असते
तशी ठरवून केलेल्या लग्नाचीही असते......

तो-तिला नि ती-त्याला ओळखतही नसते
वीसेक लोकांत ओळख पटलेलीही नसते....

होकार असाच एका नजरेत द्यायचा असतो
बाकी सर्व नशिबावर सोडून द्यायचे असते...

काहींना कधी कधी असाच गुलामही मिळतो
तर काहींना कधी हुकूमी एक्का लाभतो....

काहीच्या नशिबी मात्र दुर्री-तीर्री च येते
कारण ही एक "ब्लाइण्ड गेम" असते....

येईल त्या पत्त्याने खेळून दाखवायाचे असते
जिंकून हरण्यापेक्षा,हरून जिंकायचे असते....

कारण "ब्लाइण्ड" जरी असली तरी
ही आयुष्याची "गेम" असते...

आयुष्यात एकरुप असुन

सागरी मीठीत हळुच शिरले किनारे
आसवे गाळून परत फ़िरले किनारे.

आयुष्यात एकरुप असुन सागराशी
दुष्ट लाटांनी हसत उधळले किनारे.

मीठ चोळूनी हळूच लहर फ़ीरली ती
शेवटी कीचांळत तडफ़डले किनारे.

वादळाच्या मीठित जणु उरलाच वारा
सागरा घेऊन कुशित निजले किनारे.

साउलीसाठी जिव गुदमरला उन्हांत
संपण्याआधीच जिव हरले किनारे.

आज येऊदे प्रलय अचल मी उरेन
ठोकुन छाती मग गडगडले कीनारे.

पापण्यांती घेउन जखम जगी जगलो
निवडूंगा पाहुन कुजबुजले किनारे

मी खरेच तू सांगितलेले काम करतोय.....

मला परमेश्वर भेटला
मी त्याला सहजंच विचारलं
तु सगळ्यात चांगली गोष्ट कुठली बनवलीस ?
माणसाचे मन

आणि सगळ्यात वाईट गोष्ट ?
माणसाचे मन,

बाप्पा मला पुढे म्हणाला.....
ऐक, मी एक कुबेर बनवला होता...
त्याच्याकडे जगातली सगळ्यात जास्त संपत्ती होती, पैशाची.
मी तुला बनवला अन आता तुझ्याही वाट्याला संपत्ती येतीये, माणसांची..........
लक्षात ठेव, एक माणूस हा कुबेराच्या संपत्तीच्या दसपट मोलाचा असतो...........
मनं जप, मनं जोड, माणसं मिळव.......
विचार कर.........."

तेंव्हापासून हे वेड लागलंय...........
आज एक एक करुन मोती जुळवतोय, माणसं जोडतोय,
खरेच पुन्हा कधी बाप्पा भेटला तर त्याला सांगण्यासाठी,
की मी खरेच तू सांगितलेले काम करतोय.....

वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!!!!!!

ह्दयात कुणाच्यातरी नेहमीसाठी बसावं....,
बसून ह्दयात मग शांतपणे निजावं....!
हक्काने कुणावरतरी कधीतरी रुसावं.....,
मग त्याच्याच समजूतीने क्शनभर विसावं....!


वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!!

वाटत कधी-कधी खूप मूसमूसुन रडावं......,
ह्ळूच येवून त्याने मग अश्रू अलगद पुसावं.....!
वाटत कधी-कधी कुणाचतरी होउन पाहावं.....,
कुणाच्यातरी प्रेमात आपणही न्हाउन निघावं....!.


वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!!

वाटत कधी-कधी आपणही स्वप्न बघावं.....,
क्शनभर का होइना स्वतःला विसरुन बघावं......!
वाटत कधी-कधी आपणही लिहून बघावं.....,
लिहीता-लिहीता का होइना आपणही प्रेमात पडावं.....!!


वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!!!!!!

सांगा,उशीर होतोय का??????

ती माझ्याकडे बघते
मी तिच्याकडे बघतो
पण बोलणे होतच नाहि
बोलायला उशीर होतोय का?

काल सुद्धा तिने खूप वेळा पाहिले
माझेच लक्षच नव्हते
म्हणून मला नाहि कळले
बघायला सुद्धा आता उशीर होतोय का?

माझी नजर गर्दीतून तिलाच शोधत असते
तिची नजर देखिल कोप-यात वाट पहात असते
नजर मिळाल्यानंतर ती गोड हसते
मला हसायला उशीर होतोय का?

ती का बोलायला येत नाहि
याचा विचार मी करतो
आणि समोर आली कि मला सगळ्याचाच विसर पडतो
माझ्या विचरण्याला उशीर होतोय का?

दिवसामागून दिवस जात आहेत
आमचे नुसते असेच चालू आहे
कधी कोणी तरि पुढे येणार का?
अजून होणारा उशीर थांबवणार का??

आता सुद्धा मला उशीर होतोय
इतके दिवस तिला पहातोय
तिच्या सौंदर्याला शब्दात ऊतरवायला
उशीर होतोय का?
सांगा,उशीर होतोय का??????

काय हरकत आहे ?

आहे माझं प्रेम तुझ्यावर
जीव ओवाळते ना मी
वाट पाहते तुझ्या येण्याची
काय हरकत आहे....?

तुझं हसणं बोलणं वावरणं
आवडतं मला
तुझं निखळ स्वच्छ वागणं
मोहवितं मला
काय हरकत आहे...?

हो, मी पाहते स्वप्न
तुझ्या माझ्या स्वप्नांची
तू रंग भरावेस असंही वाट्त मला
काय हरकत आहे...?

माझी स्वप्न माझी आहेत
माझे रंग माझे आहेत
माझं प्रेम माझं आहे
मग काय हरकत आहे?

माझी तुझ्यावर बंधन नाहीत
तुला "तशी" स्पंदनं ही नाही
तुला माझा त्रास ही नाही
की मझ्या प्रेमाचा जाच ही नाही
तरी..

तू प्रेम केल नाही
तरी मी प्रेम करते ना
कुणासमोर नाही तरी
आतल्या आत झुरते ना
काय हरकत आहे?......

हरकत असून तरी काय होणार आहे?
बंधन घातलीत मनाला
तरी किती पाळल्या जाणार आहेत?
मग का बंधून ठेवायच?
प्रेम करणारच ना बांधुन देखील
मग मुक्त पणे करायचं
काय हरकत आहे?

असाव कुणीतरी......

असाव कुणीतरी......
आपल्या हाकेला 'ओ' देणार.....
रिमझिंत्या पावसात हळूच छत्रीत बोलावनार..

असाव कुणीतरी......
आपल्या सोबत चालणार..
चांदण्यात फिरताना हातात हात घेणार..

असाव कुणीतरी......
कधी वाद घालणार..
खोटा रुसवा आणून, पुन्हा आपल्यावरच रागवणार..

असाव कुणीतरी......
मनमोकळ बोलणार..
काहीही न सांगता, अगदी मनातल ओळखणार..

असाव कुणीतरी......
खूप काही विचारणार..
लहान लहान गोष्टीसाठी शपथ घालणार..
असाव कुणीतरी...................

जीवनातील प्रत्येक क्षणासाठी तुला खूप शुभेच्छा.!!

मैत्रीला नियमांचे अन अटींचे बंध नसतात,
चेहरे दिसले नाही तरी मनं मात्र नक्की दिसतात....
चांगल्या मैत्रीचा ठेवा भाग्यवंतांनाच मिळतो,
गर्दीतल्या थोड्यांशीच आपला सूर जुळतो....
सुरात गायलेलं मैत्रीचं गीत आयुष्याला सुरेल करतं,
अशा गीताचं माधुर्य आयुष्यभर पुरुन उरतं....
सुदैवाने आपल्यातही असंच मधुर नातं आहे.
त्याच्या आधाराने आयुष्य सुखात व्यतीत होतं आहे....
आपली मैत्री अशीच आहे कायम मनात जपण्यासारखी,
चिरकाळ आनंद देणाऱ्या गोड सुरेल गाण्यासारखी !!!!
आपलं नातं कायम राहो हीच एक सदिच्छा,
जीवनातील प्रत्येक क्षणासाठी तुला खूप शुभेच्छा.!!

ही माझी कविता स्वप्नात आली.

काल रात्री गाढ झोप लागली, सकाळच्या प्रहरी चक्क ही माझी कविता स्वप्नात आली. ती आपणा समोर सादर करीत आहे.

***

नाजूक , गोरीपान,लांबसडक तिची बोटे,
बोटांमध्ये शुभ्र पांढरा कागद...
प्रकटू लागली त्यावर अक्षरे,
माझ्या हृदयातून हळूच बाहेर पडून...
अक्षरांचे .झाले शब्द...
कमळाच्या पानावर दव बिंदू पडावेत तसे...
जणु तिच्या अंतरात पडत आहेत..


तिच्या ओल्या पापण्यान्मधून ,
थरथरत्या डोळयांतून प्रतिबिंबित होतात..
लपविले तिच्या ओठांनी शब्द...
पण समजावले थरथरत्या डोळ्यांनी...


डोळे तिचे सांगून गेले----
" सारे विखुरलेले क्षण,
हरवलेले सुंदर क्षण,
तू हळूवारपणे जोड...
म्हणजे जुळतील मने,
अंतर अंतरात सामावलेले असेल.."

खाडकन जाग आली,
नि ही कविता स्वप्नात आली.
कां आली मला जाग ?
कां तुटले हे गोड स्वप्न?


मीच माझ्यावर रागावलो,
मीच रुसलो , मी हसलो..
वेडे स्वप्न आपणास सांगण्यासाठी,
अधीर् मी झालो..

आता कोठे...

आता कोठे हसावयाचे शिकलो आहे
ज़खमांनाही जपावयाचे शिकलो आहे

आता बघुया कोण रोखतो भेट आपुली
स्वप्नि तुजला पहावयाचे शिकलो आहे

एकांताची मुळी न उरली भीती मजला
आठवनीतच रमावयाचे शिकलो आहे

रडगाणे मी कशास गाऊ लोकांमध्ये
अलगद अश्रू टिपावयाचे शिकलो आहे

जाता येता लोक पाहती मुग्ध होऊनि
चिखलामध्ये फुलावयाचे शिकलो आहे

जन्मोजन्मि मरणा संगे भेटी झाल्या
तेव्हा कोठे जगावयाचे शिकलो आहे

मी मराठा ,मरकर भी नही हटा, वो मराठा!!!!

मी मराठा ,मरकर भी नही हटा, वो मराठा!!!!
एक मावळा!!


अजुनही बोथट झाली नाही धार शिवबाच्या तलवारीची,
कुणाचीही हिम्मत नाही मराठयांना संपवण्याची,
घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला,
'मराठा' शिवाय पर्याय नाही महाराष्‍ट्राच्या मातीला !!!
मी मराठी... या दोन शब्दात माझी ओळख आहे..
मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे.

कसं सांगू, कसं समजावू.....

हा आहे "आमचा महाराष्ट्र".
इथं आशाआकांक्षाना मिळते संधी, अन् इच्छांना श्वास.
मोठे येतात मोठे जातात, पण खचत नाही कधी हिम्मत अमुची....
गरीब किंवा सधन असो जेव्हा वेळ येते, आम्ही एक होतो,
पुण्याचा निवांत असो, किंवा मुंबईची धावपळ
जो थांबत नाही, जो थकत नाही, तोच आहे माझा महाराष्ट्र
कधी गल्ल्यांमध्ये घोष होई "गणपती बाप्पा मोरया"
कधी नवरात्रींचा रास रंगत होई दांडिया
जो आला त्याला आपला केला,
दु:खी दुबळ्याला, ओलावा प्र॓माचा दिला
हाच आहे छत्रपती शिवाजीं सारख्या वीरांचा महाराष्ट्र
पोलादासारख्या निर्धाराच्या सामान्य माणसाचा महाराष्ट्र
- एक मावळा!!

देश भक्ती हे पाप असे खरं,
तर मी पापी घोर भयंकर |
मात्र पूण्य ते असेल माझा,
नम्र तरी अधिकार तयावर||

" जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा... "

महाराष्ट्र दिना च्या हार्दिक शुभेच्छा !!!!

" जय जय महाराष्ट्र माझा,
गर्जा महाराष्ट्र माझा
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ... "