Wednesday, April 30, 2008

ही माझी कविता स्वप्नात आली.

काल रात्री गाढ झोप लागली, सकाळच्या प्रहरी चक्क ही माझी कविता स्वप्नात आली. ती आपणा समोर सादर करीत आहे.

***

नाजूक , गोरीपान,लांबसडक तिची बोटे,
बोटांमध्ये शुभ्र पांढरा कागद...
प्रकटू लागली त्यावर अक्षरे,
माझ्या हृदयातून हळूच बाहेर पडून...
अक्षरांचे .झाले शब्द...
कमळाच्या पानावर दव बिंदू पडावेत तसे...
जणु तिच्या अंतरात पडत आहेत..


तिच्या ओल्या पापण्यान्मधून ,
थरथरत्या डोळयांतून प्रतिबिंबित होतात..
लपविले तिच्या ओठांनी शब्द...
पण समजावले थरथरत्या डोळ्यांनी...


डोळे तिचे सांगून गेले----
" सारे विखुरलेले क्षण,
हरवलेले सुंदर क्षण,
तू हळूवारपणे जोड...
म्हणजे जुळतील मने,
अंतर अंतरात सामावलेले असेल.."

खाडकन जाग आली,
नि ही कविता स्वप्नात आली.
कां आली मला जाग ?
कां तुटले हे गोड स्वप्न?


मीच माझ्यावर रागावलो,
मीच रुसलो , मी हसलो..
वेडे स्वप्न आपणास सांगण्यासाठी,
अधीर् मी झालो..

No comments: