Wednesday, April 30, 2008

मी मराठा ,मरकर भी नही हटा, वो मराठा!!!!

मी मराठा ,मरकर भी नही हटा, वो मराठा!!!!
एक मावळा!!


अजुनही बोथट झाली नाही धार शिवबाच्या तलवारीची,
कुणाचीही हिम्मत नाही मराठयांना संपवण्याची,
घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला,
'मराठा' शिवाय पर्याय नाही महाराष्‍ट्राच्या मातीला !!!
मी मराठी... या दोन शब्दात माझी ओळख आहे..
मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे.

कसं सांगू, कसं समजावू.....

हा आहे "आमचा महाराष्ट्र".
इथं आशाआकांक्षाना मिळते संधी, अन् इच्छांना श्वास.
मोठे येतात मोठे जातात, पण खचत नाही कधी हिम्मत अमुची....
गरीब किंवा सधन असो जेव्हा वेळ येते, आम्ही एक होतो,
पुण्याचा निवांत असो, किंवा मुंबईची धावपळ
जो थांबत नाही, जो थकत नाही, तोच आहे माझा महाराष्ट्र
कधी गल्ल्यांमध्ये घोष होई "गणपती बाप्पा मोरया"
कधी नवरात्रींचा रास रंगत होई दांडिया
जो आला त्याला आपला केला,
दु:खी दुबळ्याला, ओलावा प्र॓माचा दिला
हाच आहे छत्रपती शिवाजीं सारख्या वीरांचा महाराष्ट्र
पोलादासारख्या निर्धाराच्या सामान्य माणसाचा महाराष्ट्र
- एक मावळा!!

देश भक्ती हे पाप असे खरं,
तर मी पापी घोर भयंकर |
मात्र पूण्य ते असेल माझा,
नम्र तरी अधिकार तयावर||

No comments: