Wednesday, April 30, 2008

आता कोठे...

आता कोठे हसावयाचे शिकलो आहे
ज़खमांनाही जपावयाचे शिकलो आहे

आता बघुया कोण रोखतो भेट आपुली
स्वप्नि तुजला पहावयाचे शिकलो आहे

एकांताची मुळी न उरली भीती मजला
आठवनीतच रमावयाचे शिकलो आहे

रडगाणे मी कशास गाऊ लोकांमध्ये
अलगद अश्रू टिपावयाचे शिकलो आहे

जाता येता लोक पाहती मुग्ध होऊनि
चिखलामध्ये फुलावयाचे शिकलो आहे

जन्मोजन्मि मरणा संगे भेटी झाल्या
तेव्हा कोठे जगावयाचे शिकलो आहे

No comments: