Wednesday, April 30, 2008

काय हरकत आहे ?

आहे माझं प्रेम तुझ्यावर
जीव ओवाळते ना मी
वाट पाहते तुझ्या येण्याची
काय हरकत आहे....?

तुझं हसणं बोलणं वावरणं
आवडतं मला
तुझं निखळ स्वच्छ वागणं
मोहवितं मला
काय हरकत आहे...?

हो, मी पाहते स्वप्न
तुझ्या माझ्या स्वप्नांची
तू रंग भरावेस असंही वाट्त मला
काय हरकत आहे...?

माझी स्वप्न माझी आहेत
माझे रंग माझे आहेत
माझं प्रेम माझं आहे
मग काय हरकत आहे?

माझी तुझ्यावर बंधन नाहीत
तुला "तशी" स्पंदनं ही नाही
तुला माझा त्रास ही नाही
की मझ्या प्रेमाचा जाच ही नाही
तरी..

तू प्रेम केल नाही
तरी मी प्रेम करते ना
कुणासमोर नाही तरी
आतल्या आत झुरते ना
काय हरकत आहे?......

हरकत असून तरी काय होणार आहे?
बंधन घातलीत मनाला
तरी किती पाळल्या जाणार आहेत?
मग का बंधून ठेवायच?
प्रेम करणारच ना बांधुन देखील
मग मुक्त पणे करायचं
काय हरकत आहे?

No comments: