Wednesday, April 30, 2008

मराठी पाउल पडते पुढे

स्वराज्य तोरण चढे गर्जती तोफ़ांचे चौघडे
मराठी पाउल पडते पुढे.
माय भवानी प्रसन्न झाली, सोनपावले घरास आली आजच दसरा आज दिवाळी
चला सयांनो अंगणी रेखु कुम्कुम केशर सडे
मराठी पाउल पडते पुढे.
पक्षी आम्ही वीर उद्याचे, बाळमुठीला बळ वज्राचे वारस होवु अभिमन्युचे
दूध् आईचे तेज प्रवाहे नसतुनी सळसळे
मराठी पाउल पडते पुढे
स्वये शस्त्र देशर्थ हाती धरावे
टिकावे रणी वा लदुनी मरावे
तुझ्या रक्षणा तुच रे सिद्ध् होसी
तुझ्या संकटी देव धावून येती
जय जय रघुवीर समर्थ
शुभ घडीला शुभ मुहुर्थी
सनई सांगे शकुन वंदिं
जय भवनी जय भवनी
दशदिशांना घुमत वाणी
जयजयकरे दुमदुमती हे सह्याद्रीचे कडे
गर्जती तोफांन्चे चौघडे
मराठी पाउल पडते पुढे
मराठी पाउल पडते पुढे

No comments: