Friday, May 2, 2008

सये, आज भिजलो तुझ्या अमृताने

सये, आज भिजलो तुझ्या अमृताने,
मी स्पर्शात ओल्या न्हाऊन आलो…
सवे, पाहिला मी हर्ष अंबराचा,
मी सोहळा दिशेचा पाहुन आलो…..

डोळ्यात तुझीया निजे सावली,
पैंजणे फुलांची सजे पावली…
प्रवास उद्याचा तुझा मखमली..,
मी वाटा सुगंधी शोधुन आलो…..

अंगणी चांदण्याची बरसात होते,
सर ही रुपेरी दारात येते…..
आता धुकेरी नको त्या मशाली,
मी चांद नभीचा घेउन आलो…….

हे बोल माझे तु ओळखावे,
अन, राज सारे तुज आकळावे
वा-यासवे सुर माळुन घे तु…
मी अंतरा तुझाच गाउन आलो….

No comments: