Thursday, May 1, 2008

मला एवढेच वाटते..................................

मला एवढेच वाटते..................................
मला एवढेच वाटते सुन्दर आयुष्य जगावे,
स्वप्नाचे गाव पवलोपावली बसावे

सुन्दर कल्पनानी सजलेले असावे,
वास्तवाचे भान मात्र सदैव रहावे

जगण्याला मानाचा मुजरा असावा,
अपमानाला क्षणीकही थारा नसावा

एक विश्वासाची सोबत असावी,
प्रेमाने मायेने मने जुळावी

मला एवढेच वाटते नवी आशा फुलावी,
येणार्या शतकची सुन्दर पहाट असावी.........

No comments: